Home महाराष्ट्र पुणे पुण्यात ४७ कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त, भारतीय सैन्यातील एकाची देशासोबत गद्दारी!

पुण्यात ४७ कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त, भारतीय सैन्यातील एकाची देशासोबत गद्दारी!

0

सैन्यदल गुप्तचर विभाग तसेच पुणे पोलिसांनी बुधवारी पुणे शहरामध्ये धाड टाकून ४७ कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत, यामध्ये सहा आरोपींना अटक करण्यात आली असून यातील एक जण सैन्यातील जवान आहे.

पुण्यातील विमान नगर भागातील एका बंगल्यामध्ये सदर नकली नोटांचा अड्डा बनवण्यात आला होता, दरम्यान कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी सदर कारवाई करण्यात आली. हे लोक मोठ्या शिताफीने असली नोटांसोबत नकली नोटांचे मिश्रण करून बाजारामध्ये ह्या नोटांचा खप घडवत होते.

सैन्यदलाच्या Southern Command Liaison Unit (SCLU) of Military Intelligence (MI) आणि पुणे येथील crime branch यांनी मिळून ही कारवाई केली आहे.

ताब्यात घेतलेल्या ६ आरोपींपैकी शेख अलिम गुलाब खान हा सैन्यदलात नाईकपदावर आहे आणि तो पुण्याच्या छावणीत काम करतो. “ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी सैन्यदलाचा जवान हा या सर्व कारस्थानाचा मास्टरमाइंड आहे”, असे तपस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.