Home महाराष्ट्र “राज ठाकरे साहेबांच्या नादाला लागायचं नाही, सांगून ठेवतो”: बाळा नांदगावकर

“राज ठाकरे साहेबांच्या नादाला लागायचं नाही, सांगून ठेवतो”: बाळा नांदगावकर

0

नुकतंच मनसेचं पहिलं महाधिवेशन पार पडलं. अधिवेशना दरम्यान बोलतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “आमच्या आरत्यांचा त्रास लोकांना होत नाही मग नमाजचा त्रास लोकांना का होतो?” असा प्रश्न उपस्थित केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या या विधानावरुन एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी “गेले अनेक वर्ष राज ठाकरे राजकारणात होते. मात्र त्यांच्या कानाला आताच त्रास कसा काय होतोय?” असा प्रश्न उभा करत राज ठाकरेंवर तोफ डागली.

इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर बाळा नांदगावकर आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करून म्हणाले, “राज ठाकरे यांच्या नादाला लागायचं नाही, आताच सांगून ठेवतो. पाहिजे तर अबू झमीला विचारा” असं म्हणत “मनसे दणका देण्यात येईल” असा इशारा दिला आहे. बाळा। नांदगावकर यांचं ट्विट पुढील प्रमाणे :