Home महाराष्ट्र राज्यपालांचा वेळ वाढवून देण्यास नकार : काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनही अद्याप शिवसेनेला पाठिंब्याचीही कुठली सूचना...

राज्यपालांचा वेळ वाढवून देण्यास नकार : काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनही अद्याप शिवसेनेला पाठिंब्याचीही कुठली सूचना नाही.

0

बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा शिवसेनेकडे नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादी शिवसेनेला साथ देणार का यावर महाराष्ट्रात चर्चा पेटली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीची निवडणुकपूर्व आघाडी आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास तो दोन्ही पक्षांमध्ये सविस्तर चर्चा करून घेतला जाईल’ असे सांगितले होते.

मात्र राष्ट्रवादी शिवसेनेला पाठींबा देणार का याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की “काल संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राज्यपालांचे पत्र मिळाले. आम्ही २४ तासांच्या आत दोन पक्षांसोबत चर्चा सुरू केली. आम्हाला ७.३० वाजेपर्यंतची मुदत होती. राज्यपालांना वेळ वाढवून देण्याची मागणी केली. मात्र राज्यपालांनी वेळ नाकारली आहे. वेळ नाकारली तरीही दावा नाकारलेला नाही. आता पूढे काय? याकडे राज्याचे लक्ष आहे.