Home महाराष्ट्र टीइटी परीक्षेचा निकाल जाहीर, १६,००० हुन अधिक उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र

टीइटी परीक्षेचा निकाल जाहीर, १६,००० हुन अधिक उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र

0

टीईटी अर्थात महाराष्ट्र राज्यपरीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून तब्बल १६,५९० उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र ठरले आहेत. १९ जानेवारी २०२० ला घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील अनेक चुकांमुळे निकाल रखडला होता. अनेक वादांतून मार्ग काढून अखेर काल ५ ऑगस्टला निकाल www.mahatet.in या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला.

ABP माझा च्या मीडिया न्यूजनुसार यावर्षीचा निकाल गेल्या ५ वर्षांतील निकालाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. परंतु परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या मानाने हा निकाल कमी असल्याचे समजते. पहिली ते पाचवीच्या गटासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी ८८,६८८ उमेदवार होते. त्यापैकी १०,४८७ उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले आहेत. तसेच सहावी ते आठवी या गटासाठी असलेल्या १ लाख ५४,५९६ उमेदवारांपैकी ६,१०५ उमेदवार पात्र झाले आहेत. निकालात काही अडचण असल्यास येत्या १५ ऑगस्टपर्यंत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी अशी माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे.