Home महाराष्ट्र संजय राऊत म्हणजे शरद पवारांच्या घरासमोरील खरूज आलेला कुत्रा! : भाजप नेते...

संजय राऊत म्हणजे शरद पवारांच्या घरासमोरील खरूज आलेला कुत्रा! : भाजप नेते अनिल बोंडे

0


सध्या देशात करोनासारख्या आजारानं अक्षरशः थैमान घातलं आहे. त्यातच सरकारकडूनही अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पण सध्या यावरूनसुद्धा राजकारण तापत असलेले दिसत आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भाजपाला काहीच गांभीर्य नसलेला पक्ष म्हटलं होतं. तसंच दंडुका पडल्याशिवाय डोकं ठिकाणावर येणार नाही, असं संपादकीयमधून खडकाऊन संगीतले होते. दरम्यान, यावरून भाजपा नेते आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी मोठा हल्लाबोल केला आहे. “संजय राऊत म्हणजे पवारांच्या घरचे खरूजलेले कुत्रे आहेत!,” असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. 

अनिल बोंडे यांनी ट्विटरवरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. “ही राजकारण करण्याची वेळ नाही. विरोधी पक्षावर टीका करणारे संजय राऊत हे कोण आहेत? ते शरद पवार यांच्या घरचे खरूजलेले कुत्रे आहेत. या परिस्थितीत केंद्रातील आणि राज्यातील सरकार सोबत आहे,” अशा स्वरूपाचा ट्विट त्यांनी केलं आहे.

संजय राऊत यांनी संपादकीय मध्ये पुढील वक्तव्य मांडले आहे, “एका व्यक्तीच्या चुकीमुळे शंभरजणांना, त्या शंभरांतून पुढच्या हजारांना कोरोना बाधणार असेल तर त्या एका व्यक्तीच्या पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवा आणि आरोग्यसेवाच आहे! पोलिसांना दंडुका का वापरावा लागतो, याचा विचार प्रमुख विरोधी पक्षाने सुद्धा करायला हवा. प्रमुख विरोधी असलेल्यांनी मात्र मुख्यमंत्री मदतनिधीसारख्या महत्त्वाच्या बाबतीतही सवतासुभा केला आहे!”