Home महाराष्ट्र “संजय राऊत हे एक नंबरचे फेकाडे आहेत” : संदीप देशपांडे

“संजय राऊत हे एक नंबरचे फेकाडे आहेत” : संदीप देशपांडे

0

एका कार्यक्रमादरम्यान संजय राऊत यांनी ‘मनसे कार्यकर्त्यांनी गाडी फोडली असे सांगितले होते.’ यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सणसणित प्रतिउत्तर दिलं आहे. “संजय राऊत हे एक नंबरचे फेकाडे आहेत” अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर तोफ डागली. पुढे देशपांडे म्हणाले, “राज ठाकरेंनीच त्यांना सामनामध्ये आणले होते. कदाचित त्यांना सामनामध्ये आणले नसते तर आज राऊत एखाद्या कार्यालयात कारकुनी म्हणून काम पाहत असते” असा टोला देशपांडे यांनी लगावला.

लोकसत्ताच्या एका रिपोर्ट नुसार, एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखती दरम्यान देशपांडे बोलत होते. पुढे राऊत यांच्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण देत देशपांडे म्हणाले, “ज्या महाराष्ट्र सैनिकांनी तुमची गाडी जाळली त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. राऊत यांनी राज ठाकरेंकडून नवी कोरी गाडी घेतली” अशीही देशपांडे यांनी टीका केली आहे. “राऊत यांना आता काही काम नाही म्हणून फक्त चर्चेत राहण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत” असंही देशपांडे यांनी म्हटलं आहे.