Home आरोग्य महाराष्ट्रात कलम १४४ लागू, ५ पेक्षा जास्त लोकांच्या जमावर बंदी

महाराष्ट्रात कलम १४४ लागू, ५ पेक्षा जास्त लोकांच्या जमावर बंदी

0

‘कोरोनाशी मुकाबला करताना आपण आता अधिकच खंबीर पावले टाकत आहोत. हा रोग समाजात पसरण्याच्या आत रोखणे फार महत्वाचे आहे, सर्वात कठीण काळ आता सुरु झाला आहे.’ त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधून केलेल्या थेट प्रसारणात केली. मात्र यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता निश्चय, संयमाने शासनाच्या सोबत याचा मुकाबला करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

रेल्वे मंत्रालयाने आज देशभरातील रेल्वे व उपनगरीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांतून लगेचच राज्यातील जनतेशी संवाद साधला व राज्य शासन पुढील परिस्थिती हाताळण्यास खंबीर आहे, याची ग्वाही दिली.जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे, त्या गोष्टींची अजिबात कमतरता नाही. तसेच ही दुकाने किंवा या सेवा बंद राहणार नाहीत. त्यामुळे त्याचा साठा करून ठेऊ नका. अजिबात घाबरून जाऊ नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले. संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर आहे. निश्चय, संयम, जिद्द आणि स्वयंशिस्त या माध्यमातून आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू, असा विश्वास व्यक्त करतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा मनापासून सहकार्य करण्याचे, शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे.

इतर महत्वाचे मुद्दे –
-जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांमधील अंतर्गत बस सेवा सुरु राहील
– अन्नधान्य, भाजीपाला व औषधे ही दुकाने सुरूच राहतील.
– बँका, वित्तीय संस्था सुद्धा सुरू राहतील.
– शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.
– आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून महाराष्ट्रात येणारी विमाने बंद करीत आहोत.
– ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत. अशा लोकांनी कृपा करून १५ दिवस घराच्याबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.
– चाचणी केंद्रे आपण वाढवली आहेत. ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल.
– सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी मात्र बंद राहिल.
– अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती आहे.
– पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या.

पहा काय काय म्हणाले उद्धव ठाकरे: