Home महाराष्ट्र पहा अभिजित बिचुकले यांना किती मतं मिळाली…

पहा अभिजित बिचुकले यांना किती मतं मिळाली…

0

ठाकरे कुटूंबातील निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणाऱ्या आदित्यने विधानसभा निवडणुक चांगलीच गाजवली आहे व विजयी देखील झाले तर या उलट बीगबॉस फेम अभिजित बिचुकले दणदणीत पिछाडीने पराभूत झाले आहेत. अर्थातच युवा नेतृत्व आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत असल्यामुळे वरळी मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होतेच. मात्र अभिजित बिचुकले निवडणूक गाजवणार का याचीही सर्वांना उत्कंठा होती. पहिल्या फेरीपर्यंत अभिजित बिचुकले शून्यावर होते मात्र मतमोजणी संपेपर्यंत बिचुकलेंना १५० मतं मिळाली असे समजले..

एकीकडे ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा कुणीतरी विधानसभेच्या रिंगणात उतरलं. याचवेळी अभिजित बिचुकले यांनी थेट आदित्य यांना आव्हान दिल्यानं राज्यभरात आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. इतकेच नव्हे तर राज्यभरातील जनतेला बिचुकले यांना किती मतं मिळतील याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मजमोजणीच्या दिवशी बिचुकलेंना पहिल्या फेरीअखेर शून्य मतं तर सरते शेवटी त्यांना १५० पेक्षा अधिक मतं मिळाली आहेत असे जाहीर झाले; अर्थात त्यांचा मोठा पराभव झाला आहे.