
“महाराष्ट्रातील ही शिवसेना आणि काँग्रेसची युती फार काळ टिकणार नाही.” असं वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. सोबतच “आगामी दिवसांमध्ये शिवसेनेला काँग्रेससोबत जाण्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल” असाही त्यांनी इशारा दिला.
“विधासाभा निवडणूका दरम्यान शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात मते मागितली होती आणि माजबाप जनतेने शिवसेना व भाजप मतं दिले होते. आणि आता केवळ जंदादेश मान्य न करता केवळ मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवला आणि भाजपाशी युती तोडली, हे जनता मान्यकारणार नाही” आशा सणसणीत शब्दात त्यांनी टीका केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी हे भाष्य केले. दरम्यान ते असेही म्हणाले की “शिवसेना-काँग्रेसच्या युतीला कुठलाही आधार नाही, ही फक्त संधीसाधू युती आहे. म्हणून हा महाराष्ट्राच्या जनतेचा एक प्रकारे विश्वासघातच आहे”