Home महाराष्ट्र शिवसेनेचे उपविभागप्रमुख शेखर जाधव यांच्यावर गोळीबार

शिवसेनेचे उपविभागप्रमुख शेखर जाधव यांच्यावर गोळीबार

0

शिवसेनेचे उपविभाग प्रमुख शेखर जाधव यांच्यावर गुरुवारी एका अज्ञाताने बेछूट गोळीबार केला आहे. ही घटना विक्रोळी भागात घडली असून आरोपीने एका मागोमाग 3 राउंड फायर केले त्यापैकी एक गोळी जाधव यांच्या खांद्याला लागली परिणामी तात्काळ जाधव यांना गोदरेज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. यावेळी त्यांचा मुलगा देखील त्यांच्या सोबत होता मात्र त्याला कुठल्याही प्रकारची दुखापत झाल्याची माहिती मिळालेली नाही.

शिवसेनेचे उपविभाग प्रमुख शेखर जाधव गुरुवारी आपल्या मुलासह टागोर नगर येथील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी अज्ञान इसमाने त्यांच्यावर गोळीबार केला. जाधव यांना यापूर्वी देखील जीवे मारण्याच्या धमक्या कॉल द्वारे आल्या आहेत. गोळीबार करण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.