Home महाराष्ट्र पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे शिवसेनेने वेधले लक्ष; म्हणाले “सत्तास्थापनेचे नंतर बघू”

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे शिवसेनेने वेधले लक्ष; म्हणाले “सत्तास्थापनेचे नंतर बघू”

0

निकालाला जवळपास १० दिवस उलटून गेले तरी राज्यात सत्ता स्थापनेचं गाडं अजूनही अडलं आहे. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांचे मंत्रिमंडळ स्थापन करण्याबाबत एकमत होत नसल्याने सत्ता कोणाच्या हाती जाईल हे ठरत नाहीये. याच काळात पावसानेही जोर धरला असून राज्यभरात बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले परंतु सर्व नेत्यांचे याकडे सत्ता स्थापनेच्या नादात दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच शिवसेनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत असल्याचे सांगितले आहे.

आज पत्रकार परिषदेत बोलतांना उद्धव ठाकरेंनी सांगितले की त्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भेट दिली. तसेच ‘नुकसानाची पाहणी हेलिकॉप्टर मधून होत नसते’ असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला व शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असेही सांगितले. याशिवाय आदित्य ठाकरे यांनीही कोकणात पावसामुळे नुकसान झालेल्या भागाला भेट दिली असून ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे आवश्यक असून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू’ असे प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. तसेच सत्ता स्थापनेचे होत राहील, आधी शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.