Home महाराष्ट्र वांद्रे पूर्व मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

वांद्रे पूर्व मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

0

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाल्यानंतर जागावाटपातील त्रुटींमुळे बऱ्याच उमेदवारांनी नाखूष होऊन बंड पुकारले होते. दोन्ही पक्षांनी यातल्या अनेक उमेदवारांना समजावून बंड मागे घ्यायला लावले असले तरी अजूनही काही बंडखोर उमेदवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी युतीला जागा न मिळण्याची शक्यता आहे. यावर पर्याय म्हणून शिवसेना आणि भाजपला आता कठोर पावले उचलावी लागत आहेत.

वांद्रे पूर्व मतदारसंघातील शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना जागा न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत शिवसेनेने तृप्ती यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. तसेच त्यानंतरही प्रचारादरम्यान अनेक पक्षविरोधी कारवाया त्यांनी केल्या. परिणामी शिवसेनेने त्यांना पक्षातून बाहेर काढले. या गोष्टीची माहिती देण्यासाठी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले.

वांद्रे पश्चिमच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. मात्र युतीची घोषणा झाल्यानंतर तृप्ती यांना उमेदवारी न देता त्याजागी विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे तृप्ती यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावाला जराही मान्यता न देता पक्षविरोधी कारवाया केल्या. त्यामुळे शिवसेनेने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली गेली असे मीडिया न्यूजवरून समजले.