
काल २४ डिसेंबर २०२० ला शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यांचे पुत्र विहंग याची ईडीने तब्बल पाच ते सहा तास चौकशी केली. या चौकशीचे कारण म्हणजे टॉप्स समूहविरोधातील आर्थिक गैरव्यवहारात शिवसेना नेत्यांची नावे आली आहेत. आज ११ वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र नुकतेच परदेशातून परतले असल्याने सध्या विलगीकरणात आहे असे सांगून ईडीला चौकशीसाठी एका आठवड्याचा वेळ त्यांनी मागितला आहे.
प्रताप सरनाईक यांना व त्यांचा मुलगा विहंग यांना आज चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. मात्र चौकशीसाठी न जाता पुढील आठवड्यात बोलावण्याची मागणी केली आहे. विहंग यांची पत्नी दवाखान्यात असल्याने व प्रताप सरनाईक स्वतः विलगीकरणात असल्याने ते दोघेही आज चौकशीसाठी गेले नाही. दरम्यान ईडीच्या कारवाईमुळे प्रताप सरनाईक तसेच इतर शिवसेना नेतेही संतप्त आहेत.