Home महाराष्ट्र शिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी...

शिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी

0
sharad pawar

प्राईम नेटवर्क : महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा अद्यापही तिढा सुटलेला नाही. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक बैठका झाल्या. मात्र अद्यापही दोन्ही पक्षाचा अंतिम निर्णय ठरलेला नाही. राज्यात काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करणं शक्य नाही. त्यामुळे या सर्व चर्चेत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही केंद्रस्थानी आल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांची दिल्लीत चर्चा झाली.

मात्र अद्याप कुठलाही पर्याय निघाला नसल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट नुसार सोनिया गांधी या सत्तावाटपावर नव्हे तर दुसऱ्याच मुद्द्यावर अडून बसल्या आहेत. काँग्रेस आणि शिवसेना यांच्या विचार भिन्न आहे. त्यामुळे भविष्यात काही मुद्द्यांवर शिवसेनेची भूमिका काँग्रेससाठी अडचणीची ठरू शकते. परिणामी या वादग्रस्त मुद्द्यांवर शिवसेनेनं भूमिका स्पष्ट करावी, अशी सोनिया गांधी यांची मागणी असल्याची माहिती माहिती दिली जात आहे.

लोकसत्ता च्या रिपोर्ट नुसार नागरिक दुरुस्ती विधेयक यांसारख्या मुद्द्यांवर शिवसेनेची काय भूमिका आहे, असा काँग्रेसचा प्रश्न आहे. या प्रश्नांवरील शिवसेनेच्या भूमिकेबाबत शरद पवार यांनी हमी द्यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. पण शिवसेनेच्या आक्रमक हिंदुत्त्वाच्या भूमिकेमुळे शरद पवार यांच्याकडून अद्याप कोणतीही हमी देण्यात आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तापेच अजूनही सुटला नसल्याचं चित्र आहे.

हे हि वाचा :

राष्ट्रवादीला होऊ शकतो डबल फायदा ; राज्यासह केंद्रातही मंत्रिपद

‘तान्हाजी’च्या ट्रेलरमधील “या” दृष्यावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप : मागितला खुलासा