Home महाराष्ट्र शिवसेनेकडे पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार

शिवसेनेकडे पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार

0

मीडिया रिपोर्ट नुसार महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे संयुक्त स्थापन होणार अशी चिन्ह आहेत. तत्पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या समन्वय समितीत किमान समान कार्यक्रम निश्चित झाला असून, सत्तावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे.

या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेकडे पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद राहील, असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी १४ तर काँग्रेसच्या वाट्याला १२ मंत्रिपदे येतील असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.