औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेला कोंडीत खेचणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून तिखट शब्दात प्रत्युत्तर मिळाले आहे. “भाजपचे दादामिया ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? इतिहासाचे उत्खनन करण्याची एवढी आवड असेल तर २५ वर्षांपूर्वी औरंगाबादचे नामांतर बाळासाहेबांनीच केले आहे हे लक्षात घ्यायला हवे” असे सामना च्या अग्रलेखात म्हटले आहे.
यानंतर संपादकांनी “असे अनेक दादामिया गोधडी भिजवत होते तेव्हा शिवसेना छातीचा कोट करून हिंदुत्व व राष्ट्रकार्यासाठी लढत होती” अशा तिखट शब्दांंत समाचार घेतला.
काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला औरंगाबादचे नामांतर करण्याबाबत कोंडीत टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून सामनाच्या अग्रलेखात चंद्रकांत पाटलांवर समाचार घेण्यात आला.