Home महाराष्ट्र पुणे शिवशाही बस ५० फूट खोल दरीत कोसळून थरारक अपघात: एका प्रवाशाचा मृत्यू...

शिवशाही बस ५० फूट खोल दरीत कोसळून थरारक अपघात: एका प्रवाशाचा मृत्यू तर एक गंभीर

0

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसचा कात्रज घाटात थरारक अपघात झाला. यात बस ५० फूट खोल दरीत कोसळली असून अपघातात एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १ प्रवासी गंभीर जखमी आहे. अधिक हाती आलेल्या माहितीनुसार ही बस पुण्याहून सांगलीच्या दिशेने जात होती. बसमध्ये 28 ते 30 प्रवासी होते दरम्यान कात्रज घाटात शिंदेवाडीनजीकच्या वळणावर हा अपघात झाला. 

घटनेची माहिती मिळाल्याबरोबर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस व जवळपासच्या स्थानिक नागरिकांकडून तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असे सांगण्यात येत आहे.