Home महाराष्ट्र “एकत्र येण्यात उगाच एवढी वर्ष फुकट घालवली”- उद्धव ठाकरे

“एकत्र येण्यात उगाच एवढी वर्ष फुकट घालवली”- उद्धव ठाकरे

0

“आमचे सरकार मजबूत आहे, आम्ही समविचारी आहोत, गोरगरिबांना न्याय देणारे हे सरकार आहे आणि म्हणूनच इथे ही गर्दी जमली आहे” असे उद्धव ठाकरे जुन्नर मधील समारंभात बोलतांना म्हणाले. पुढे बोलतांना त्यांनी आम्ही एकत्र येण्यास उशीर केला असे मत मांडले.


झी 24 तासच्या मीडिया रिपोर्टनुसार या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित होते. त्यांनी “एल्गार विषयी आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत” असे स्पष्ट केले. “आम्ही चांगल्या कामांकरिता एकत्र आलो आहोत आणि जे चांगले आहे ते करून दाखविल्याशिवाय शांत बसणार नाही” अशी शपथ आई जिजाऊंच्या साक्षीने त्यांनी घेतली.
पुढे शिवनेरी किल्ल्याच्या विकासाबद्दल बोलतांना मुख्यमंत्र्यांनी किल्ल्यावर लेझर लाईट अँड साउंड शो सुरू करणार असल्याची घोषणा सुद्धा केली. शिवनेरी हे आपले वैभव आहे आणि त्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सुद्धा त्यांनी नमूद केले.