
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेसाठी केलेली धडपड वेगळी सांगायला नको. सोशल मीडिया, अग्रलेख, पत्रकार परिषद अगदी दवाखान्यात असतांनाही त्यांनी त्यांचा लढा कायम ठेवला. मात्र जो दिवस पाहण्यासाठी त्यांनी हे पराकोटीचे प्रयत्न केले त्याच दिवसाचा मुख्य सोहळा पाहण्यासाठी संजय राऊत यांना थांबता आलं नाही.
मीडिया रिपोर्ट नुसार काल शिवाजी पार्क येथे शपथविधी सोहळा पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय एकत्रित आला होता, जिकडे तिकडे लोकच लोक दिसत होते. दरम्यान गर्दी आरडाओरडा, गोंधळ आणि धक्काबुक्की होत होती त्यामुळे अचानक राऊत यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तात्काळ त्यांना आराम करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेऊन जाण्यात आलं. तिथे रणजीत सावरकर यांनी राऊत यांची काळजी घेतली. नुकताच अँजिओग्राफी झाल्याने त्यांना असा त्रास झाला असावा मात्र आता त्याची तब्येत स्थिर आहे.