Home महाराष्ट्र …म्हणून उद्धव ठाकरे ठरले आठवे मुख्यमंत्री: सहा महिन्यात व्हावं लागेल विधिमंडळाच्या एका...

…म्हणून उद्धव ठाकरे ठरले आठवे मुख्यमंत्री: सहा महिन्यात व्हावं लागेल विधिमंडळाच्या एका सभागृहाचे सदस्य; कारण…

0

ठाकरे परिवाराने या आधी कधीच कुठली निवडणूक लढवली नाही हे सबंध राज्याला ठाऊक आहे. परिणामी विधानसभा आणि विधान परिषद यापैकी कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसूनही राज्याचे मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे हे आठवे मुख्यमंत्री ठरले आहेत. महत्वाचं म्हणजे ठाकरे यांनी एकही निवडणूक लढवलेली नाही म्हणून ते इतर आठ मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळे आहेत. हे आठ मुख्यमंत्री यापूर्वी  सदस्य राहिलेले होते मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिले असे मुख्यमंत्री आहेत जे आजपर्यंत एकही निवडणूक न लढता मुख्यमंत्री झाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुढील सहा महिन्यात विधिमंडळ किंवा संसदेच्या कुठल्याही एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागेल. कारण राज्यघटनेनुसार विधिमंडळाच्या सदस्य नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री होता येतं मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर अर्थात शपथविधी नंतर महिन्याच्या आत विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. एकंदरीत येत्या सहा महिन्यात उद्धव ठाकरे यांना एका सभागृहाचं सदस्य व्हावं लागेल.