Home महाराष्ट्र “उद्धवा, काही नतद्रष्ट्यांनी तुझ्याविरुद्ध छुपी मोहीम सुरू केली आहे. तू लढत...

“उद्धवा, काही नतद्रष्ट्यांनी तुझ्याविरुद्ध छुपी मोहीम सुरू केली आहे. तू लढत राहा वाघा”: अभिनेता किरन माने

0


सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी राज्य सरकार अगदी कसोशीने प्रयत्न करत आहे.नागरिकांपर्यंत कोरोनाचा प्रार्दुभाव पोहचू नये यासाठी सरकार सदैव प्रयत्नशील आहे. सध्या महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. सरकार सातत्याने कोरोनाकाळात राजकारण करू नका असे सांगत आहे.

तरीसुध्दा काल जी काही घटना वांद्रे येथे घडली या घटनेमुळे कुठेतरी पुन्हा एकदा राजकारणाला सुरूवात झाली आहे. या घटनेनंतर आरोपप्रत्यारोपांना सुरूवात झाली. काही राजकिय नेत्यांची ट्वीटरव टीव टीव करून झाली. यात कोणी सरकारच्या बाजूने होतं तर कोणी विरोधात. प्रत्येकजण सोशल मीडियावर व्यक्त होतं होतं.

अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करून मुख्यमंत्री ठाकरे यांना त्याचा पाठिंबा दर्शवला आहे. “सतत सांगतोस, मला या संकटप्रसंगी राजकारण नकोय तरीही ‘उद्धवा, काही नतद्रष्टांनी,तुझ्याविरोधात छुपी मोहीम सुरू केलीय,खरंतर तू म्हणालास तसं, ‘राजकारण खेळायला आयुष्य पडलंय’पण मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमातहे ऐकणार नाही ! तू लढत रहा वाघा.. आमचा तुझ्यावर विश्वास आहे”,असे या आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. किरणे माने यांनी आपलं म्हणणं एका छानश्या गद्य कवितेत गुंफलं आहे. तर या कवितेच्या शेवटी, “तू बाळासाहेबांचा मुलगा आहेस त्यामुळे तू लढत रहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असे म्हटले आहे. उद्धवा. माझ्या राजा. बाळासाहेबांच्या बछड्या.. तू लढ.आम्ही तुझ्या पाठीशी आहोत !!!”

https://m.facebook.com/photo.php?fbid=10220287584527340&set=a.3508579880783&type=3&refsrc=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F