Home महाराष्ट्र या जिल्ह्यांमधील एस टी सेवा सुरू होणार? वाचा तुमच्या जिल्ह्यातली एसटीची परिस्थिती

या जिल्ह्यांमधील एस टी सेवा सुरू होणार? वाचा तुमच्या जिल्ह्यातली एसटीची परिस्थिती

0

कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरून सरकारने राज्याला तीन वेगवेगळ्या झोन मध्ये विभाजित केले आहे. यानुसार १५ पेक्षा जास्त रुग्णाच्या जिल्ह्यांना रेड झोन, त्यापेक्षा कमी रोगसंख्येच्या जिल्ह्यांना येलो झोन तर एकही रुग्ण संख्या नसेल तिथे ग्रीन झोन असे हे विभाजन असेल. यानुसार येलो झोन आणि ग्रीन झोन मधील व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच धर्तीवर या दोन झोन मधील राज्य परिवहन सेवा म्हणजेच एसटी सेवा परत सुरू करणार असल्याचा सरकार मानस आहे.

राज्य सरकार राज्य परिवहन सेवा सुरू करत असले तरी हे सेवा फक्त जिल्ह्यामध्ये अंतर्गत सेवा असेल म्हणजेच शहर अंतर्गत सेवा तसेच तालुक्यांमधील सेवा ही सूरु होणार असून, दोन जिल्ह्यांमधील सेवा ही सुरू करणार नसल्याचे राज्य सरकार निर्णय घेईल असे राज्य परिवहनचे महासंचालक यांनी सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
वाचा तुमचा जिल्हा कुठल्या झोन मध्ये येतो.

रेड झोन जिल्हे: मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड, सांगली, औरंगाबाद

येलो झोन जिल्हे: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोंदिया, धुळे

ग्रीन झोन जिल्हे: नंदुरबार, सोलापूर,परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली.