Home महाराष्ट्र अनलॉक ६ ची नियमावली राज्य सरकारकडून जाहीर

अनलॉक ६ ची नियमावली राज्य सरकारकडून जाहीर

0

केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारनेही अनलॉक ६ च्या गाईडलाईन्स जरी केल्या आहेत. अनलॉक ५ च्या गाईडलाईन्सची मुदत वाढवण्यात आली असून ३० नोव्हेंबरपर्यंत तेच नियम पाळण्याचे आदेश यापूर्वी केंद्र सरकारने दिले होते. त्याप्रमाणेच राज्य सरकारनेही हीच मार्गदर्शक तत्वे अनलॉक ६ मध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याअंतर्गत हॉटेल्स, रेस्टोरंटस, सिनेमागृह व मेट्रो सेवा सुरु राहणार आहेत. जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नसणार आहे. शाळा कॉलेजेस उघडण्याबाबत कुठलाही निर्णय अद्याप राज्य सरकारने घेतलेला नाही. तसेच कंटेनमेंट झोनमध्ये मात्र ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन पाळावे लागणार असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नियमावलीमध्ये नमूद केले आहे. या भागांमध्ये अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर काहीही सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांना कंटेनमेंट झोनबद्दलची माहिती राज्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.