Home महाराष्ट्र मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टात अर्ज!

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टात अर्ज!

0

मराठा आरक्षणाविषयी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत. हा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी मराठा आरक्षणावरील स्थगितीचा अंतिम आदेश उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे काही समर्थकांमध्ये नाराजी होती.

आता ही सुनावणी घटनापिठासमोर होईल. त्यासाठी आधी घटनापीठ स्थापन करण्यात येईल नंतरच सुनावणी होईल. सद्या तरी यासाठी दिवस ठरलेला नसला तरी आम्ही प्रयत्न सोडणार नाही असे मुख्यमंत्री बोलले.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याच्या मागणीसाठी तीव्र प्रतिसाद मिळत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी सोमवारी बैठक झाली. त्यात ते बोलले की मराठा समाजाचे आरक्षण कायम राहील यासाठी प्रयत्नांची कुठलीही कसर सोडली जाणार नाही.