Home महाराष्ट्र मंत्रिपद न दिल्याने ‘या’ काँग्रेस आमदाराच्या कार्यकर्त्यांनी केली काँग्रेस भवनाची तोडफोड

मंत्रिपद न दिल्याने ‘या’ काँग्रेस आमदाराच्या कार्यकर्त्यांनी केली काँग्रेस भवनाची तोडफोड

0

काल अर्थात दिनांक ३० डिसेंबरला ठाकरे सरकारच्या विस्तारित मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून अख्खा महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत होता. महाविकास आघाडीचे सरकार असल्याने काँग्रेसच्या बऱ्याच आमदारांना मंत्रिपदे मिळाली. परंतु काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनाची तोडफोड केल्याची बातमी समोर आली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संग्राम थोपटे यांना निवडून आल्यास मंत्रिपद देण्यात येईल असे वचन दिले होते. मात्र त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. आज अर्थात मंगळवारी थोपटे यांच्या समर्थकांनी ‘एकच दादा संग्रामदादा’ अशी घोषणाबाजी करत पुण्याच्या शिवाजीनगर येथील काँग्रेसच्या कार्यालयात प्रवेश केला व सामानाची तोडफोड केली असे मीडिया न्यूजवरून समजले. तोडफोड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त करत सांगितले की, “महाविकास आघाडीच्या सरकारने नवीन आमदारांना मंत्रिपद दिले पण काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळातून वगळले गेले त्यामुळे आम्ही प्रचंड नाराज झालो. थोपटे यांच्यासोबत पक्षाने अन्याय केला आहे.”