Home महाराष्ट्र हे चित्र आयुष्यभर लढण्याची जिद्द देईल, सुप्रिया सुळेंच अजित पवारांसाठी भावनिक स्टेट्स

हे चित्र आयुष्यभर लढण्याची जिद्द देईल, सुप्रिया सुळेंच अजित पवारांसाठी भावनिक स्टेट्स

0

प्राईम नेटवर्क : राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना काल (शनिवारी) घडली. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी अजित पवार यांच्यावरचा राग सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप स्टेस्टस द्वारे दाखवल्याचं दिसून आलं.

अजित पवारांच्या बंडखोरीमुळे पवार कुटुंबियांच्या उभी फूट पडल्याचं दिसत आहे. अजित पवारांच्या या अचानक वागण्यामुळे पवार कुटुंबीय उद्विग्न झाल्याचं पाहायला मिळालं, रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक प्रोफिलचा दोनदा फोटो बदलला, त्यांनी आजोबा शरद पवार यांच्या सोबत असलेला फोटो फेसबुक वर टाकत आपण शरद पवार यांच्या बरोबरच असल्याचा दाखवून दिल, तर सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हाट्सअपचं स्टेटस अनेक वेळा बदललं, त्यांनी आपल्या व्हाट्सअप वर कालपासून अनेक स्टेट्स बदलल्याचं पाहायला मिळाल..

काल पासून त्यांनी आपल्या व्हाट्सअप वर ठेवलेली काही स्टेट्स –

“तुम्ही जीवनात कोणावर विश्वास ठेवता?, आयुष्यात असं फसवल्याची भावना यापूर्वी कधी वाटली नाही. ज्यांना पाठिंबा दिला. प्रेम दिलं, त्या बदल्यात त्यांनी आपल्याला काय दिलं.”

“माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सुरु असून हा मला अधिक मजबूत करेल. यातून प्रत्येकजण लवकर बाहेर पडेल”

“चांगले विचार नेहमी विजयी होतात, प्रामाणिकपणा आणि मेहनत कधीच वाया जात नाही, हा मार्ग अवघड असतो, मात्र तोच शाश्वत आहे”

या व्हाट्स अप स्टेट्स वरून सुप्रिया सुळे यांच्या मनाची झालेली द्विधा अवस्था दिसून येते, सध्या राष्ट्रवादी कडून अजित पवारांच्या घर वापसीचे सर्व प्रयत्न फोल ठरत असल्याचं दिसून येत आहे. मात्र अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयावर ते किती काळ कायम राहतात हे पाहण महत्वपूर्ण असेल.