Home आरोग्य मकर संक्रांतीला आपली, लहान मुलांची व पक्षांची ‘अशी’ काळजी घ्या.

मकर संक्रांतीला आपली, लहान मुलांची व पक्षांची ‘अशी’ काळजी घ्या.

0
Activists rescue a pigeon injured from a kite string in Vadodara on Wednesday. Express Photo by Bhupendra Rana. 13.01.2016.

मकर संक्रांती म्हणजे आनंदाचा सण! या दिवशी लोक रुसवे फुगवे सोडून एकमेकांचे तोंड गोड करतात व आनंदाने राहतात. सोबतच पतंगोत्सव साजरा केला जातो तर मित्रांनो दरवर्षी या जीवघेण्या मांज्यामुळे अनेकांचा मृत्यू होतो म्हणूनच यंदा पतंग उडवतांना काळजी घ्या.

▪️रेल्वे स्टेशन, उच्च व लघु दाबाच्या वीजवाहिन्या, फिडर व वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर राहून पतंगबाजी करा व विजेत्या तारांवर पतंग अडकल्यास काढण्याचा प्रयत्न देखील करू नका. रेल्वेच्या रुळांपासूनही लांबच राहा.

▪️कठडे असलेल्या घर अथवा बिल्डिंगवरूनच पतंग उडवा. कटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावरून धावू नका व लहान मुलांना देखील धावू देऊ नका.

▪️मुख्य रस्त्यावर जेथून भरधाव वाहने येतात-जातात, तेथे मांजा व तत्सम गोष्टी आडव्या येणार नाहीत याची काळजी घ्या. मांजा धारधार असल्याने दुचाकी चाकांना इजा होऊ शकते. विशेषतः चायना मांजा वापरू नका.

▪️तारेवर अडकलेल्या पक्षांना काढण्याचा प्रयत्न करू नका. याकरिता प्रत्येक शहरात काही पक्षीप्रेमी संस्था असतात ज्या हे कार्य करतात. त्यांचा तपास करून त्यांच्या मदतीने पक्षांना सोडवा.

▪️पतंग उडवतांना लहान मुलांची, स्वतःची आणि पक्षांची काळजी घ्या. आपल्या क्षणिक आनंदासाठी पक्षांचा जीव जाऊ नये याकरिता आपण काळजी घ्यायला हवी. आनंदाच्या दिवशी आपल्या अथवा कुणाच्याच आयुष्यात दुःख अथवा संकट येणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला संक्रातीच्या अनेक शुभेच्छा.