
इराण आणि अमेरिकेदरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झाल्याने केवळ आजूबाजूच्या देशातच नाही तर औरंगाबादच्या वरूड काजी या गावातील शेतकऱ्यांचा देखील जीव भांड्यात पडला आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे या गावातून होणारी कारल्यांची निर्यात थांबली आहे. वरूड काजी या गावातून थेट अमेरिकेत कारले निर्यात होतात. मीडिया रिपोर्ट नुसार दररोज सुमारे दीड ते दोन टन कारले अमेरिकेसह विविध रराज्यांत येथून पाठवले जातात. परिणामी मागील काही वर्षात कारल्याचं गाव म्हणून वरुड काजी ओळखलं जाऊ लागलं.
दुष्काळाने यंदा सर्वच शेतकऱ्यांना हताश केलं होतं. मात्र वरुड काजी येथील शेतकऱ्यांनी अवेळी झालेल्या पावसाचा फायदा घेत भाजीपाल्याची शेती केली. या भागात 80 ते 100 एकरवर कारल्याच्या बागा लावलेल्या आहेत. किंबहुना आता या गावावर निराशेचं सावट पसरलं आहे. इराण आणि अमेरिकेत निर्माण झालेल्या तणावाचा फटका इथल्या कारले उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. ही कारली लोकल बाजारात विकली तर 10 ते 15 रुपये प्रति किलोचा भाव मिळतो. मात्र विदेशात कारल्यांना चांगला दर मिळतो, जवळपास 35 रुपये प्रति किलो. इराण आणि अमेरिकेदरम्यान तणावाचं वातावरण लवकर शांत व्हावं. तरच पुन्हा हा बळीराजा सुखावेल.