
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे एकचं खळबळ उडाली आहे. मंत्रिमंडळ बैठक तसेच इतर कामांसाठी अशोक चव्हाण यांचा नांदेड ते मुंबई हा प्रवास सतत सुरुच होता. या प्रवासादरम्यानच त्यांना बाधा झाल्याचं पीटीआय सूत्रांकडून समोर आलं आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना सुद्धा कोरोणाची लागण होत असल्याने ठाकरे सरकार अजून किती आघाड्यांवर असुरक्षित आहे असा प्रश्न विचारला जात आहे.
दरम्यान याआधी राज्य मंत्रिमंडळातील जितेंद्र आव्हाड यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मात्र जितेंद्र आव्हाड या संकटातून सुखरुप बाहेर पडले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा रविवारी रात्री ५० हजार २०० च्या पुढे गेला. यामधील १६३५ रुग्णांचा मृत्यू झाला असून १४ हजार ६०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रविवारी एकाच दिवसात ३ हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले.
विरोधी पक्ष भाजप हा ठाकरे सरकारवर वारंवार या ना त्या कारणावरून टीका करत आहे, महाराष्ट्र बचाओ आंदोलनानंतर पदवीच्या शेवटच्या वर्षीच्या मुलांविषयी धारेवर धरण्यात आले. आता मात्र पियुष गोयल आणि महाराष्ट्र राज्य असा वाद निर्माण झाला, परराज्यातील मजुरांसाठीच्या रेल्वेगाड्या वरून सदर वाद निर्माण झाला. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या आणि ठाकरे सरकारची होत असणारी कोंडी यामुळे विरोधी पक्ष आपली पोळी भाजून घेत आहे हे नक्की!