
हेलिकॉप्टरच्या बड्या बड्या बाता मारणाऱ्या ठाकरे सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर केली आहे.
निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं तर 71 हजार रुपयांचं तिकीट एसटी महामंडळानं घेतल्याच्या बातमीचा आधार घेत भातखळकर यांनी एक ट्विट केलं आहे.
“राज्यभरातील प्रमुख सात संतांच्या पालख्या पंढरपूरला नेण्यासाठी शासनाकडून शिवशाही बस उपलब्ध करून दिली जाईल”, असे आश्वासन सरकारने केले होते.
सदर विधानामुळे, ” शासन विनामूल्य बससेवा उपलब्ध करून देणार, असा समज संस्थानच्या विश्वस्तांचा झाला. शासनाकडून कसलाही आदेश प्राप्त झाला नव्हता. अखेर संस्थानने तीन दिवसांच्या मुक्कामाचं 71 हजार रूपये प्रवास भाडे भरल्यानंतर मंगळवारी सकाळी महामंडळाने शिवशाही बस उपलब्ध करून दिली”
सदर प्रकारामुळे वारकरी गण तसेच विश्वस्थ मंडळ सरकारवर प्रचंड संतप्त असून सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करायला हवी अशी चर्चा सगळीकडे होत आहे.