Home महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक वर्ष होणार जानेवारी ते डिसेंबर?

राज्यात शैक्षणिक वर्ष होणार जानेवारी ते डिसेंबर?

0

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर करण्याचा विचार चालू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तश्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

तसेच केंद्रानी घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील एक समिती नेमण्याचे आदेशही देण्यात आला आहे. सद्याच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत 100% शिक्षण पोहोचण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालु आहेत तसेच 10 वि च्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष शाळा उघडता येतील का याचाही विचार करणे सुरू आहे.

या बैठकीला मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, उच्च व तंत्राशीक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आणि वरीष्ठ अधिकारी इत्यादी उपस्थित होते.