
“एल्गार परिषदेचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमा” अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. मात्र आता एल्गार परिषद तपासावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वाद वाढत चालले आहेत. दरम्यान “केंद्राला सहकार्य न केल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल” अशी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शंका व्यक्त केली.
लोकमतच्या एक रिपोर्ट नुसार याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “केंद्रातल्या कायद्याच्या तरतुदीबाहेर राज्यांच्या कृत्यामुळे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात ९७ राज्यं बरखास्त केली होती. पुढे अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात या कायद्यात बदल झाला. त्यामुळे राज्य बरखास्त होऊ शकत नाही मात्र यातून गंभीर कारवाईला शासनाला सामोरे जावे लागू शकते” असा इशारा मुनगंटीवार यांनी दिला आहे.