
येवले चहामध्ये रंगाची भेसळ करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. एक न्यूज पोर्टलच्या रिपोर्ट नुसार अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालात येवले चहातील भेसळीची बाब सिद्ध झाली आहे. सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत नियमबाह्य रंगाचा वापर करणे बेकायदेशीर आहे. एफडीएने येवले चहाच्या नमुन्यांची तपासणी केली असता, ‘येवले अमृततुल्य’ चहामध्ये रंगाचा वापर केला जात असल्याची माहिती पुढे आली. रंग वापरत असल्यामुळेच येवले अमृततुल्य चहाला लाल रंग येतो, असंही सांगण्यात येत आहे. सध्या येवले फूड प्रॉडक्ट्सला उत्पादन बंद ठेवण्याचे आदेशही अन्न आणि औषध प्रशासनाने दिले असून पुढील चौकशी चालू आहे.
यापूर्वी देखील काही महिन्यांपूर्वी येवले चहामध्ये ‘मेलामाईन’ नामक पदार्थ आढळल्याने एफडीएच्या वतीने कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा येवले अमृततुल्य चहा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.