Home महाराष्ट्र “पवारांच्या राजकीय वारसदाराचा प्रश्न मिटला. सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन!” : शदर पवारांचं...

“पवारांच्या राजकीय वारसदाराचा प्रश्न मिटला. सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन!” : शदर पवारांचं काम झालं सोपं

0

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची बोलणी अंतिम टप्प्यात असतांना अजित पवार यांनी भाजपाशी हातमिळवणी करून राज्याच्या राजकारणाला जोरदार धक्का दिला आहे. परिणामी आता राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याची चर्चा आहे. अशा वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी एक ट्विट केले आहे ज्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. ते ट्विट मध्ये म्हणाले.
“NCP के ५४ में से ५३ शरद पवार जी के साथ रहेंगे। अजीत पवार अकेले रह जायेंगे। शरद पवार के उत्तराधिकारी की समस्या भी हल हो गयी। बधाई सुप्रिया!!”

दिग्विजय सिंह यांच्या मते राष्ट्रवादीचे ५४ पैकी ५३ आमदार शरद पवार यांच्यासोबत राहतील. त्यामुळे अजित पवार एकटे पडतील आणि महत्वाचं म्हणजे शरद पवारांच्या राजकीय वारसदाराचा प्रश्नही मिटला. त्याच बरोबर त्यांनी सुप्रिया सुळे, यांचे अभिनंदन केले, अर्थात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यापैकी राष्ट्रवादी वारसा पुढे कोण चालवणार हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. पण आता सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सुप्रिया सुळे यांना दिग्विजय सिंह यांनी ट्विट द्वारे शुभेच्छा दिल्या. दिग्विजय सिंह यांच्या मते आता राजकीय वारसदार निवडण्याचं शरद पवारांचं काम आता अधिक सोपं झालं आहे.