येत्या विधानसभा निवडणूकीत भाजप शिवसेना युतीने लढणार आहेत हे आपल्याला ठाऊकच आहे. बरेच दिवस युतीचे घोडे अडून राहिल्यानंतर एकदाचा निर्णय पक्का झाला असला तरी बरेच उमेदवार त्यावर नाखूष असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात काही उमेदवार बंडखोरी करत असल्याने दोन्ही पक्षांसमोरचे आव्हान वाढले आहे.
आतापर्यंत राज्यातील ३० मतदारसंघांतील उमेदवारांनी बंडखोरी केली असल्याने या ३० जागांवरील युतीचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे असे मीडिया न्यूजवरून समजले. युतीच्या घोषणेनंतर आलेल्या उमेदवारांच्या याद्यांमध्ये बऱ्याच इच्छुक उमेदवारांचे नाव आले नव्हते. त्यामुळे या उमेदवारांनी बंडखोरी करून अर्ज भरले होते. यातील बऱ्याच उमेदवारांना समजावून भाजप-शिवसेनेने त्यांना अर्ज मागे घ्यायला लावले. त्यातील काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरीही हे ३० उमेदवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याने महायुतीला ३० जागांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.