Home महाराष्ट्र अजित पवारांसोबत प्रचार करून 12 तासाच्या आत ‘ह्या’ माजी आमदाराचा भाजपप्रवेश :...

अजित पवारांसोबत प्रचार करून 12 तासाच्या आत ‘ह्या’ माजी आमदाराचा भाजपप्रवेश : निवडणूक चार दिवसांवर असताना राष्ट्रवादीला आणखी एक धक्का!

0

विधानसभा निवडणुका चार दिवसांवर असतांनाही राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंडळी अजूनही भाजपात प्रवेश करीत आहेत. आता हेच पहा ना, पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

मीडिया न्यूज नुसार बापूसाहेब पठारे हे पुण्यातील वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार आहेत. ते २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. विशेष म्हणजे बापूसाहेब पठारे सोमवारी अजित पवार यांच्यासोबत रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या गोष्टीला १२ तास होण्यापूर्वीच पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ सोमवारी सकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी उमेदवार सुनील टिंगरे यांच्यासह माजी आमदार बापूसाहेब पठारे हेसुद्धा उपस्थित होते. त्यानंतर रात्रीच ते मुंबईत दाखल झाले आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं जगदीश मुळीक यांच्यासमोरील अडथळा दूर झाला आहे. राष्ट्रवादीकडून पठारे हे वडगाव शेरी मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, राष्ट्रवादीने सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या बापूसाहेब पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अशी चर्चा आहे.