पुण्यातील SP कॉलेजात लागलेल्या या होर्डिंग मुळे एकच खळबळ उडाली आहे. ‘जिसको चाहीये पाकिस्तान उनको भेजो कब्रस्तान’ आशा आशयाच्या या होर्डिंग मध्ये MIM चे नेते ओवेसी आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावलेल्या अमूल्याचे चेहरे लावलेले आहेत. पुण्यातील SP कॉलेजातील चौकात हे होर्डिंग लावण्यात आले आहे.
ट्विटर यूजर निखिल पवार याने ही माहिती पुणे पोलिसांना कळविली. पुणे पोलिसांनी सुद्धा या तक्रारीची दखल घेत आम्ही त्यावर योग्य चौकशी करू असे सांगितले. पवार यांनी ट्विटमध्ये आवाहन केले आहे की , “द्वेषाचं विष महाराष्ट्रात पसरू देऊ नका.”
मागच्या महिन्यात बंगलोरमध्ये झालेल्या AIMIM च्या एका सभेत ‘अमूल्या लिओना निरोन्हा’ हिने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्या नंतर तिच्यावर देशद्रोहाचा खटला भरवण्यात आला होता, याच पार्श्वभूमीवर हे होर्डिंग लावण्यात आले असून या प्रकरणामागे पुणे पोलीस चौकशी करत आहेत.
वाचा निखिल पवार यांचे ट्विट: