कोरोना लॉकडाउन संपल्यानंतर एक मोठा राजकीय भूकंप देशपातळीवर घडवून आणणार असल्याचे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
“काँग्रेस पक्षाला संपूर्णतः नेस्तनाबूत करणे आता काहीच अशक्य नाही कारण ज्या बड्या नेत्यांमुळे सद्या जे काही काँग्रेस चालत आहे ते सर्व जण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत”, असे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले
एकनाथ खडसे यांच्याविषयी प्रश्न विचारला असता, चंद्रकांत दादा यांनी सांगितले की, ” जे खडसेंना भाजपा बाहेर येण्याचे आलोभन देत आहेत ते सगळेचं भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत”
भाजपा या काळात एकमेव शक्तिशाली पक्ष बनणार असून, देशात काय काय होणार आहे हे आता येणारा काळचं सांगेल, असे चंद्रकांत पाटील यांच्या विश्वासातून दिसते, काँग्रेसचे सर्व निशाण या देशातून काढून टाकणे हे सर्वोच्च ध्येय भाजपा उराशी बाळगून आहे हे मात्र नक्की