Home आध्यात्मिक पुढच्या वर्षी लवकर या… बाप्पाच्या विसर्जनाची जय्यत तयारी !

पुढच्या वर्षी लवकर या… बाप्पाच्या विसर्जनाची जय्यत तयारी !

0

गेले दहा दिवस दररोज आराधना केल्यानंतर जड अंतःकरणाने आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज अनंतचतुर्दशीला संपूर्ण राज्यभरात गणेश विसर्जनाची तयारी जोरात चालू असल्याची दिसून येत आहे. मोठ्या शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाकडून विसर्जनासाठी विविध यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत.

विसर्जनासाठी मुंबईतील चौपाट्या, तलाव, कृत्रिम तलाव तसेच इतर ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ५० हजार पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पोलिसांसह एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स यांच्या अतिरिक्त फौजादेखील भक्तांच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईत १२९ ठिकाणी विसर्जन होणार असून महानगरपालिकेच्या वतीने ३२ कृत्रिम तलाव बनवण्यात आले आहेत. याशिवाय विविध चौपाट्या व महत्वाच्या विसर्जनाच्या ठिकाणी सूचना फलक, प्रथमोपचार तसेच वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत.विसर्जन मिरवणुकांमुळे वाहनचालकांची तसेच गणेश मंडळांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबईतील ५३ रस्ते वाहतूकीसाठी पूर्ण बंद करण्यात आले आहेत. विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. मुंबईत तसेच संपूर्ण राज्यभरात विसर्जन मिरवणुका सुखरूप पार पडाव्यात हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना!