Home महाराष्ट्र उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; मराठा आरक्षण न दिल्यास येणाऱ्या परिणामांना तुम्हाला सामोरे जावं...

उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; मराठा आरक्षण न दिल्यास येणाऱ्या परिणामांना तुम्हाला सामोरे जावं लागेल.

0

मराठा आरक्षणाबाबत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक आहेत. त्यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठा आरक्षण दिले नाही तर येणाऱ्या परिणामांना तुम्हाला सामोरे जावे लागेल, असा गर्भीत इशारा दिला आहे. तसेच आरक्षणाविषयी सरकारवर अनेक आरोप करत त्यांनी त्यांनी काही मुद्यांद्वारे मुख्यमंत्र्यांना सूचना केल्या आहेत.

उदयनराजे भोसलेंनी पत्रामध्ये मराठा आरक्षणासाठी सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, असं आवाहन करताना त्यांनी आपण या लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करु असेही सांगितले आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे तर मराठा आरक्षणाला स्थगिती का देण्यात आली त्यामुळे मराठा समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे आणि समाजाच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.