Home महाराष्ट्र उदयनराजे भोसलेंना लवकरच केंद्रीय मंत्रीपद मिळण्याची शक्यता… 

उदयनराजे भोसलेंना लवकरच केंद्रीय मंत्रीपद मिळण्याची शक्यता… 

0

विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी सोडून भाजपात आलेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा विधानसभा निवडणुकीत चांगलाच पराभव झाला होता. तसेच बहुमत मिळूनही भाजपला राज्यात सत्ता स्थापन करणे शक्य झाले नाही व परिणामी महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या उदयनराजेंना कुठलेही पद मिळू शकले नव्हते. मात्र केंद्रात भाजपचे सरकार असल्याने उदयनराजे यांना राज्यसभेत आणण्याचे प्रयत्न भाजप करत असून उदयनराजेंना केंद्रीय मंत्रिपदही देण्याचे भाजपने निश्चित केले आहे अशी माहिती मिळाली.

सकाळच्या एका रिपोर्टनुसार राज्यसभेतील महाराष्ट्राच्या एकूण १९ खासदारांपैकी ७ खासदारांच्या जागा २ एप्रिलला रिक्त होणार असल्याने एक जागा उदयनराजेंना देण्याचे भाजपने निश्चित केले आहे. त्याचबरोबर लोकमतच्या रिपोर्टनुसार भाजपच्या पाठिंब्याने केंद्रीय मंत्रिपद मिळालेले रामदास आठवले आणि खासदार अमर साबळे यांची मुदत देखील २ एप्रिलला संपत असल्याने यापैकी एका जागेवर उदयनराजेंची नियुक्ती करण्याची भाजपची योजना आहे. सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्याने महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढवण्यासाठी उदयनराजेंना मंत्रिपदावर आणण्याची तयारी भाजप करत असल्याचे बोलले जात आहे.