
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर राजे भाजपचे नियम पाळणार की धाब्यावर सोडणार, याची सगळीकडे चर्चा होती. कारण ठरल्या वेळेत कामाच्या ठिकाणी न पोहचणे ही त्यांची जुनी सवय आहे. दरम्यान आता उदयनराजे भाजपचे कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांच्या बैठकीला गैरहजर राहिले. अगदी ते राष्ट्रवादीत असतांना देखील बैठकीला अशीच दांडी मारायचे.
मीडिया न्यूज नुसार या बैठकीत नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडीक, रणजितसिंह मोहीते आदि सर्व उपस्थित होते. परंतु या सर्वांसारखेच नव्याने भाजपात आलेले उदयनराजे भाजपवर नाराज आहेत की काय, अशी देखील चर्चा होत आहे.