
आपले राज्य कोरोना महामारीचा कठोर सामना करत आहे. प्रशासन देखील सगळ्या गोष्टींची गंभीर दखल घेत असून कोरोनाला प्रबळ लढा देत आहे. देशात कोरोनामुळे विधानपरिषद निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद अडचणीत येण्याची शक्यता होती. मात्र उद्धव ठाकरे यांना आता राज्यपालांच्या राखीव जागांवरून विधानपरिषदेत नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
याच गोष्टीला पुढे करत उद्धव ठाकरे यांच्यावर सतत टीकेचे बाण सोडणारे भाजपचे नेते आणि नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “मुख्यमंत्री पद हे काँग्रेसमुळे, आमदारकी ही राज्यपालाकडून, तर पक्ष बापाचा… ह्या भिकरड्या माणसाचं स्वतःच काहीच नाही”अशी टीका त्यांनी केली आहे.
यापुढे निलेश राणे म्हणाले, ” ठाकरे महाराष्ट्रासाठी पनौती असले तरी ते स्वतःसाठी मात्र अगदी नशीबवान आहे, भिकरड्या उद्धवला सगळं बसल्या बसल्या मिळालं आता तर आमदारकी पण बसलेल्या ठिकाणी राज्यपालांनी आणून दिली. भिकेत मिळालेल्या ह्या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा”