Home महाराष्ट्र “उद्धव ठाकरे ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री असून अजितदादा पी एच डी चा विषय!!”: चंद्रकांत...

“उद्धव ठाकरे ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री असून अजितदादा पी एच डी चा विषय!!”: चंद्रकांत पाटील

0

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लोकसत्ता वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे आणि सरकार याबाबतीत भाष्य केले. “महाराष्ट्रात चार महिन्यामध्ये जे काही राजकारण झाले, त्यावरुन इथे काहीही आणि कधीही होऊ शकतं! एक दिवसाचं सरकार घडलं, तीन दिवसाचं सरकार पडलं! काकांना आवडलं नाही म्हणून माघार घेण्यात असं बरंच काय काय घडलं!!!” आणि “महाविकास आघाडी सरकार हे पाडण्याची काही एक गरज नाही तर हे सरकार त्यांच्यातील विसंवादामुळेच पडेल याबद्दल मला विश्वासचं नाही तर मी याबद्दल ठाम आहे,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिवसेनेबरोबर पुन्हा युती करणार नसल्याचे स्पष्ट संकेत चंद्रकांत पाटील यांनी या मुलाखतीत दिले,”भविष्यात निवडणुका झाल्या तर आम्ही एकट्याने निवडणुका लढवणार. नीट उमेदवार ठरवणार. सकाळी एक दुपारी एक रात्री एक अशा लोकांबरोबर जाणार नाही,” असे ते म्हणाले.तसेच उद्धव ठाकरेंवर भाष्य करताना ते म्हणाले,”उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी अजिबात जन्माला आलेले नाही तर ते नेता म्हणून सुद्धा जन्माला आलेले नाहीत. ते फक्त वारसा चालवत आहेत. उद्धव ठाकरे हे अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा.”

चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर पीएचडी करण्याची सुद्धा इच्छा व्यक्त केली आहे. “शरद पवारांवर पीएचडी करण्याचं काम चालू असताना आता अजितदादांवर पीएचडी करावी वाटत आहे. कारण महाविकास आघाडीचे सरकार असतानाही ते उपमुख्यमंत्री, त्यांचे सरकार असतानाही तेच उपमुख्यमंत्री, सिंचन घोटाळा केला तरी काही फरक नाही, शेतकऱ्यांना वाईट बोलले तरी काही फरक नाही. कधी चिडून राजीनामा सुद्धा देतात. पण इतके सगळे केल्यानंतरही ते मध्यवर्ती आहेत!” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.