Home महाराष्ट्र सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच युतीवर शिक्कामोर्तब होईल: उद्धव ठाकरे

सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच युतीवर शिक्कामोर्तब होईल: उद्धव ठाकरे

0

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राची नजर ठेपली आहे ती भाजप-सेना युती वर! अशात काल मोदींनी सेनेच्या पक्षाध्यक्षांच्या विरोधात केलेल्या खोचट वक्तव्यानंतर आता युती होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजप शिवसेना दोन्ही गटांत जागांसाठी ही रस्सीखेच गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे.

सूत्रांकडून अशाही वार्ता मिळाल्या होत्या की पुढील दोन दिवसांत युतीचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. हा निर्णय अंतिम टप्प्यात असतांना व युती होण्याची काही प्रमाणात शक्यता असतांना मात्र, ‘सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच त्यावर शिक्कामोर्तब होईल’ असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केल्याचं मीडिया न्यूजनुसार कळलं आहे. अर्थात त्यामुळे भाजप-शिवसेना युतीच्या निर्णयाची वाट पाहणाऱ्यांचा संभ्रम वाढला आहे.
चंद्रकांत खैरे यांनी दिलेल्या माहिती नुसार, “अंतिम फॉर्म्युला कुठला असेल हे ठरलेलं नाही मात्र युती होणार हे नक्की आहे.” आता पुढे हा निर्णय कुठलं वळण घेणार हे वेळच सांगेल.