Home महाराष्ट्र “उद्धवजी त्या संजय राऊतच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घराण्यावर गरळ...

“उद्धवजी त्या संजय राऊतच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय.” संभाजीराजांचा संतप्त पवित्रा तर राऊतांनी दिलं प्रत्युत्तर

0

शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याने ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रकाशनानं सबंध राज्यातून विरोध होत आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केल्याने आणि एकेरी नावाचा उल्लेख केल्याने शिवप्रेमी संतप्त आहेत. यावर दि. १२ जानेवारी रोजी “शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?” असा सवाल संजय राऊत यांनी श्रीमंत उदयन राजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना केला आहे. राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा सवाल केला. संजय राऊत यांनी केलेलं ट्विट खालील प्रमाणे…

संजय राऊत यांच्या ट्विटनंतर खासदार संभाजीराजेंनी त्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करीत म्हणाले, “उद्धवजी, संजय राऊतच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय.” त्याचबरोबर त्यांनी राऊत यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत “त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती की मी जिजाऊ जयंतीला सिंदखेड राजामध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही.” असा इशारा देखील संभाजीराजेंनी दिला. त्यांचं उत्तर पुढील प्रमाणे…

संभाजीराजेंनी केलेल्या ट्विटवर संजय राऊत यांनी पुन्हा “मी आपला नेहमीच आदर करतो. मी असे कोणते विधान केले ज्यामुळे छत्रपती घराण्याचा अपमान झाला” असा आणखी एक सवाल केला.

जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली.
शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?

संभाजीराजेंनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून “ज्या पक्षाच्या कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तात्काळ मागे घ्यावे. नाहीतर त्याचे वेगळे परिणाम होतील.” असा आणखी एक इशारा देत तात्काळ टीकेचं युद्ध थांबवलं आहे व शेवटी त्यांचा सिंदखेडराजा येथील भाषणाचा व्हिडीओ पोस्ट करत “छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही” असा त्यांनी त्या भाषणात उल्लेख केला आहे.