Home महाराष्ट्र MPSC मध्ये वंजारी आरक्षण नाही; आयोगाच्या कार्यालयावर अंडाफेक

MPSC मध्ये वंजारी आरक्षण नाही; आयोगाच्या कार्यालयावर अंडाफेक

0

मुंबईच्या लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात आज मोठा राडा पाहायला मिळाला. आगामी PSI च्या भरती परीक्षेत वंजारी समाजाला एकही राखीव जागा न ठेवल्यामुळे वंजारी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयोगाच्या कार्यालयावर अंडफेक केली आणि अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा प्रयत्न सुद्धा झाला.

मागच्या आठवड्यात PSI भरतीची जाहिरात प्रकाशित झाली होती. पण यात वंजारी समाजाला एकही जागा आरक्षित न ठेवल्याने वंजारी समाजात रोष पसरला आहे. त्यातच काही वंजारी समाजाच्या युवकांनी लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात गोंधळ घातल्याने तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. धनंजय मुंढे यांनी सुद्धा वंजारी समाजाच्या जागांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत पत्र पाठवून चर्चा करणार असल्याचे सांगितले. राज्यामध्ये वंजारी समाजाला २% आरक्षण असून वंजारी समाजाला १०% आरक्षण हवे आहे आणि त्यातही PSI भरतीत एकही जागा न मिळल्यामुळे वंजारी समाजात चीड पसरली आहे.