Home महाराष्ट्र विखे पाटलांना धक्का: संख्याबळ नसल्याने नगर जि.प. मध्ये भाजपची माघार तर राष्ट्रवादीने...

विखे पाटलांना धक्का: संख्याबळ नसल्याने नगर जि.प. मध्ये भाजपची माघार तर राष्ट्रवादीने मारली बिनविरोध बाजी!

0

नगर जिल्हा परिषदेदरम्यान माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे आणि शिवाजी कर्डिले यांना जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांनी अध्यक्षपदी व काँग्रेसचे प्रताप शेळके यांनी उपाध्यक्षपदी बाजी मारली आहे. अर्थात राज्यातील महाविकास आघाडीची जादू नगर जिल्हा परिषदेवर देखील झाली आहे

लोकमतच्या एका रिपोर्टनुसार, भाजपकडे नगर येथे जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांनी वेळेवर माघार घेतली व शेवटी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची बिनविरोध निवडी झाली.