Home महाराष्ट्र इतक्या दिवस थांबलात आता आणखी एक दिवस थांबा : पंकजा मुंडे

इतक्या दिवस थांबलात आता आणखी एक दिवस थांबा : पंकजा मुंडे

0

नुकताच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली मात्र पंकजा मुंडे या बैठकीला उपस्थित नव्हत्या. त्यामुळे ‘त्या भाजवर नाराज आहेत’ अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. news १८ लोकमतने दिलेल्या एका वृता नुसार ‘पंकजा तुम्ही भाजपवर नाराज आहात का? आसा प्रश्न विचारला असता आदी निराळच ऊत्तर दिलं, परिणामी ‘पंकजा मुंडे बंडाच्या तयारीत आहेत की काय ?’ या चर्चेला आणखीनच उधाण आलं आहे. या संदर्भात विचारले असता पंकजा मुंडे म्हणाला “इतक्या दिवस थांबलात आता आणखी एक दिवस थांबा” यावरी नक्कीच गोपीनाथ गडावर मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कमिटीची बैठकिला उपस्तित न राहण्याचं कारण ‘उद्याच्या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त असल्याने बैठकीला जाता आलं नाही तशी पक्षाला पूर्वकल्पनाही देण्यात आली होती’ अशी माहिती मिळत आहे. भाजपने यंदाच्या निवडणुकीदरम्यान अनेक मोठ्या नेत्यांचे पत्ते कट केले होते, त्यामुळे त्यांच्यापैकी जर काही नेते गोपीनाथ गडावरील कार्यक्रमासाठी आले तर ते नेते देखील पंख मुंडे सह बंड करु शकता अशी चर्चा होत आहे. पंकजा मुंडेंनी मात्र याला नकार देत ‘हा कार्यक्रम राजकीय नसून सर्व मुंडे समर्थकांना कार्यक्रमाचं आमंत्रण दिल्याची माहिती दिली.