Home महाराष्ट्र औरंगाबाद आम्ही औरंगजेबाचे वंशज नाहीत, औरंगाबादचे संभाजी नगर झालेचं पाहिजे- चंद्रकांत पाटील

आम्ही औरंगजेबाचे वंशज नाहीत, औरंगाबादचे संभाजी नगर झालेचं पाहिजे- चंद्रकांत पाटील

0


“आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आहोत औरंगजेबाचे नाही, त्यामुळे औरंगाबाद चे नामकरण संभाजी नगर व्हायलाच हवे!”, असे चंद्रकांत पाटील पत्रकारांसमोर म्हणाले.
औरंगाबाद शहरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे, या पार्शवभूमीवर चंद्रकांत पाटील यांचा औरंगाबाद दौरा होता.यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. यानंतर बोलताना त्यांनी औरंगाबदच्या नामांतरचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे आगामी काळात  औरंगाबादमधील राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा नामांतराबद्दल आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत दिला आहे. शिवसेना आधी नामांतराबाबत हट्ट धरून होती पण सत्ताबदल झाल्यामुळे शिवसेना याबाबत काहीच करणार नाही असा आरोप मनसे नेत्यांनी केला आहे.https://twitter.com/PTI_News/status/1233711902276014080?s=19